सद्ध्या ऑड्रे टोटूचा Priceless हा फ्रेंच पिच्चर पहायला घेतलाय. अतिश्रीमंत धनाढ्य लोकांची (म्हातारे का असेनात) संगत करून, त्यांच्याकडे उचलेगिरी करून उंची रहाणीमान जगणारी आयरिन एका हॉटेल वेटरला तिचा गिऱ्हाईक समजते आणि मग कालांतराने तिला त्याचा खऱ्या परिस्थितीबद्दल जाणीव होते. मात्र तिच्यावर प्रेम करता करता, मग तोही अशाच प्रकारच्या चक्रामध्ये अडकतो अशी काहीसी कथा, पुढे काय होणार या साठी movie पहायला लागेल....... इ.इ.
बघू मला इंग्लिश डब version मिळाली नसल्याने, मी subtitles ची वाट बघतोय. ऑड्रे टोटू चे काही पिच्चर मी आधी पाहिलेत. मस्त दिसते आणि भुमिका छान निभावते. तिच्या अमेली या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं होतं. ’देवा’ने recommend केल्यामुळे मी तिचा He loves me, loves me not हा movie पाहिला. He loves me, loves me not या रोमॅंटिक, सायको, थ्रिलर मध्ये तिचं काम झक्कास. तशी या चित्रपटाची कथा, सादरीकरणला नक्कीच दाद द्यावी लागेल. Overlapping, alternate scenes, One sided interpretations followed by actual incidents - give story different twists and turns. Well represented !!.
तसाच तिचा "A very long engagement" हा चित्रपट पहाण्याची संधी मला HBO TV Channel मुळे मिळाली. A very long engagement मध्ये ऑड्रे टोटू ने युद्ध्यामध्ये गायब झालेल्या सैनिकाच्या Financee ची भुमिका केलीये. वेगळ्या वेगळ्या व्यक्तींकडून मिळणारी असंबद्ध माहितीतून मागोवा काढत, आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या भेटीची दूर्दम्य इच्छा ठेवून, सरपटत चालणाऱ्या, अथक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची तिने भुमिका छानपणे निभावली होती.
-धनंजय
arre Amelie madhe hich aahe ka? movie mast aahe..sadhya goshti mandlya aahet ek ek...
ReplyDelete~sandeep