Wednesday, November 12, 2008

A quote from Mahabharat (Bhagvat geeta)

"हे धनंजय, सत्पुरूष कभी अपनी अधिकारोंकी सिमाओंका उल्लंघन नही करते" - श्रीकृष्ण

सध्या महाभारताचे ठराविक भाग पहातोय .. त्यात ऐकलेलं हे वाक्य; श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलेले एक वाक्य .... अर्थातच संजयच्या ’दैवी’ दृष्टीमुळे आपल्याल समजलेले. मी विचार करत होतो की युद्धभुमीवर युद्ध चालू असताना सारथ्य करताना श्रीकृष्णाला एवढा वेळ कसा मिळाला की त्याने अर्जुनाला जीवनाचं सार समजवलं ?
थोडं शोधलं, त्यावर एक युक्तीवाद असा केला जातो की श्रीकृष्णाने सुक्ष्म वेळ नियंत्रीत केली आणि अर्जुनाला साक्षात्कार घडवला ..... पण मग मला संजयचं विशेष वाटतंय यासाठी की त्याला ही सुक्ष्म वेळेही अनुभवता आली.... म्हणजे तोही gifted होता का ?

अजून एक मालिका NBC TVवर चालू आहे ... Heroes काही काळापूर्वी मी त्याचे काही भाग पळवत पळवत पहायचो ... त्यात Hiro
कडे अशीच काहीसी क्षमता असल्याचं दाखवलय .. अर्थात महाभारत आणि ह्या Science Fiction मध्ये compare करण्याचा काही प्रश्नच नाही .. असंच आठवलं म्हणून खरडलं.

No comments:

Post a Comment