"मेलडी बर्न्स" यांची अमेरिकेचे अगामी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अंतर्गत धोरण विभागाच्या ’मुख्याधिकारी’पदी निवड केली आहे.
टीम गेथनर - ट्रेजरी सेक्रेटरी, लॉरेन्स समर्स - राष्ट्रीय अर्थमंडळ, आणि इतर लोकांनी अधिकार ग्रहण केलय.
ओबामांच्या जवळ अश्या झोकुन देऊन काम करणारे लोक असतील, तर त्यांना अभिप्रेत असलेला, आणि अमेरिकन जनतेला हवा असलेला बदल (The Change) ते आणू शकतील अशी आशा करायला हरकत नाही.
मेलडी बर्न्स यांची एक मुलाखत मी एवढ्यात पाहिली .. बाई आश्वासक वाटतात... सारा पालीन यांच्यापेक्षा तर नक्कीच ;) अर्थातच मेलडी ह्यांची पार्श्वभुमीच, 'Center for American Progress' च्या Exce. VP च्या कामाचा अनुभव ही नक्कीच जमेची बाब आहे.
सांगितल्या शिवाय रहावत नाही ... ह्या मुलाखतीचा मुलाखतकार सकृतदर्शनी तरी निरस वाटतोय .. भाऊला त्याच्या प्रश्नांमध्येपण काय राम वाटलेला दिसत नाय.
आपल्याकडेही public policy मध्ये भरपूर काम झालंय आणि होतय .. आपल्याकडचे Policy Makers चांगल्या पॉलिसीज बनवतात ... पण त्या राबवणे, प्रत्यक्षात आणणे ही सततची बोंब आहे. Public Policy आणि working Government bodies ची Accountability ह्यांचा मेळ कधी घातला जाईल ?
Friday, January 02, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment