माजी अर्थमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आजच अशी आशा व्यक्त केलीय की भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी ९.० % विकासदर गाठेल. पी. चिदंबरम यांनी गेल्या दोन वर्षांपासून ज्या ज्या घोषणा केल्यात बऱ्याचदा त्यांच्या नेमकं उलट घडत गेलय. त्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की भारताची अर्थव्यवस्था ८.५० % चा विकासदर टिकवेल, त्यानंतर म्हटलं की ८.०% तरी नक्की राहील. इन्फ्लेशनबद्दल पण त्यांचं गणित बऱ्याच वेळा चुकलय. त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या सहकार्याने व्याजदर, इ, गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला, पण तरीही, महागाईने ११.०% ची पातळीपण ओलांडली.
आमचे एक प्राध्यापक आहेत, ते गमतीने म्हणतात :: सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवरती विश्वास ठेऊ नका त्याहीपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अर्थतद्न्य़ांवरती विश्वास ठेऊ नका कारण बऱ्याच वेळा त्यांच्या मतांमध्ये, घॊषणेमध्ये काहीतरी स्वार्थ, Hidden Agenda असतो.
Saturday, December 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment