Friday, December 26, 2008

शिक्षणसम्राट - शिक्षणाची वाट (शिक्षण प्रसाराची? देणग्या-नफ्याची?)

कुठल्याही इंजिनीअरींग, मेडीकल, फार्मसी कॉलेजेसने किती फी आकारावी हे माझ्या मते::

१. शाखांची संख्या
२. इन्फ्रास्ट्रक्चर (लॅब्ज, प्रोफेसर्स, इतर सुविधा)
३. विद्यार्थ्यांना मिळणारे Recognition ( or bluntly - कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरचा बाजार भाव - मग त्यामध्ये नोकरीची शाश्वती, पेशंटचा दृष्टीकोन-वाटणारी विश्वासार्हता, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो)
४. शासकीय कॉलेज आकारत असलेली फी

या गोष्टींनुसार ठरवण्यात यावी. माझं शिक्षण चालू होतं तेव्हा सर्व कॉलेजेसमधल्या प्रवेशांसाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा व्हायची आणि centralized admission व्हायचे. पण त्यानंतर खाजगी कॉलेजेसने शासकीय सामायिक परीक्षेमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, व स्वतःची खाजगी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली. एवढच नाही तर किती फी आकारावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं.

झालं !!

ह्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी, मेरीटवाल्या विद्या्र्थ्यालासुद्धा वर्षाला रू. ६०,००० पेक्षा जास्त फी मोजणे भाग पडायला लागलं. देणग्यावाल्यांचं तर विचारायची सोय नाही. बऱ्याच खाजगी इंजिनीअरींग, मेडीकल कॉलेजेसमध्ये पुरेसे इन्फ़्रास्ट्रक्चर नसल्याची कुजबुज मग सुरू झाली. प्लेसमेंटचा पत्ता नाही, प्रोफेसर्स म्हणुन कोणीही नुकतेच ग्रॅजुएट झालेले तरूण पोरं दिसायला लागली. (अगदीच अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या एका मित्राचा मित्र, जो अजून शिकतोय: तसा नवखा म्हणायचा, तो एका नावाजलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतोय... )

असं का होतंय/ झालं?

महाराष्ट्रामधील काही उच्चशिक्षण संस्थांकडे पहा ::

पतंगराव कदम - भारती विद्यापीठ स्वायत्त संस्था (मूंबई, पुणे)
विखे पाटील - प्रवरा इंजिनीअरींग, मेडीकल (प्रवरानगर, अहमदनगर)
डी.वाय. पाटील - डी. वाय. पाटील इंजिनीअरींग, मेडीकल, फार्मसी (मूंबई, पुणे)
रामभाऊ मोझे - गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, पुणे
रामराव आदिक - रामराव आदिक इन्श्टिटुट ऑफ टेक्नोलॉजी, इतर (मुंबई)
शरद पवार - विद्या प्रतिष्ठान (बारामती, पुणे)
छगन भुजबळ - भुजबळ नोलेज सीटी, नासिक
दता मेघे - दत्ता मेघे इंजिनीअरींग कॉलेज, मुंबई
विनय कोरे - तात्यासाहेब कोरे इन्स्टीटुट इंजिनीअरींग ऑफ टेक्नॉलोजी, वारणानगर, कोल्हापुर
पद्मसिंह पाटील - तेरणा इंजिनीअरींग कॉलेज, (नवी मूंबई)
प्रशांत हीरे - भाऊसाहेब हिरे इंजिनीअरींग, दंत, फार्मसी (नासिक, मालेगाव)
बापुसाहेब मुलक - दादासाहेब कन्नमवार कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, नागपुर
एन. नवले - सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी - इंजिनीअरींग, मेडीकल, मॅनेजमेंट, इत्यादी
लातुरकर (विलासराव देशमुख, इ) - मराठवाडा मित्र मंडळ (अपुर्ण माहितीवर आधारीत)
...... इतर संस्था.....

ह्या यादीकडे पाहिल्यानंतर, काही गोष्टी लक्षात येतायत का बघा.
जरी ह्या संस्थांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची, प्रोफेसर्सची, प्लेसमेंटची अडचण आहे असं म्हणणं किंवा तसं बोट दाखवणं अवघड आहे, पण ह्या संस्थांच्या चालकांपैकी काही लोक सत्ताधारी होते, आहेत, होतील. नियम तयार करणे, बदलणे, त्यांना अवघड नाही.

शासकीय CET Private का झाली, fee Structure ठरवण्याचे स्वातंत्र्य कॉलेजेसला का मिळाले ? इन्फ्रस्ट्रक्चर पुरेसं आहे की नाही हे ठरवण्याची, छानणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा कुठे गेली ?

ह्या संस्थांच्या व्यतिरीक्त बऱ्याच खाजगी कॉलेजेसने वरती म्हटलेल्या कॉलेजेसचा (फीसच्या बाबतीत) कित्ता गिरवण्यास सुरुवात केली (follow.करण्यास) आणि ... इथेच प्रॉब्लेम झालाय हो !
बाकी accreditation- NAC; Director of Technical Education वगैरे काय करतात कुणास ठाऊक:: Left to interpretation :)

ह्या बाबतीत माझा एक मित्र मला म्हणत होता ... काय रे .. महाराष्ट्रातील ह्या खाजगी संस्थांमध्ये बहुतांशी उत्तर भारतीय मुले असतात .... त्यांच्यामुळे महाराष्ट्राला (शिक्षणसम्राटांना) मजबुत कमाई मिळते, ही positive side बघ की. ~~~ कोणी ऐकताय काय ? ~~~ स्थानिक मुलांचं काय ? त्यांना ही अवाढव्य फी परवडणार का ?

Disclaimer: अर्थात ह्या वरील म्हटलेल्या संस्थांपैकी, संस्थाचालकंपैकी अपवाद असतील/ आहेत हे म्हणायला हवं ;)

0 comments: