Thursday, December 25, 2008

सत्यम कंप्युटर्स आणि (अ)विश्वास

सत्यम कंप्युटर्सचा शेअर गेल्या काही महिन्यांमध्ये ४०% पेक्षाही खाली उत्तरला आहे. कारणे:
- भागधारकांना विश्वासात न घेता मायटास इन्फ़्रा., मायटास प्रॉपर्टीज खरेदी करण्याची घोषणा
- जागतिक बॅंकेने अफरातफर, लाचखोरीच्या आरोपाखाली सात-आठ वर्षांसाठी घातलेली बंदी

विशेष म्हणजे वरती म्ह्टलेल्या कंपन्यामध्ये सत्यमच्या प्रमुख प्रवर्तकांपैकी (थोडक्यात मुळ मालकांपैकी) रामलिंगन राजू याच्याशी संबंधीत (कौटुंबिक) वाटा असल्याचे निदर्शनास आले आहे.

मला सत्यम मध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल आणि सत्यम बरोबर व्यवहार करणाऱ्या clients च्या भवितव्याबद्दल काळजी वाटत आहे. पहिल्या गटाधील लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होऊ घातला आहे. आणि clients ला सत्यमच्या बरोबर झालेल्या डील मधील आणि जनरल credibility बद्दल साशंकता वाटत असेल.

ज्या पद्धतीने सत्यमबद्दल बातम्या वाचण्यास मिळत आहेत (उदा. इन्फोसिस, विप्रो, टी.सी.एस. इत्यादी ह्या कंपन्या सत्यमला विकत घेऊ शकतात कारण सत्यमचे भांडवली मुल्य खुपच कमी झाले आहे). ह्या परिस्थीतीमध्ये, राजू ह्यांनी स्वत: होऊन बाजूला होऊन, विश्वसनीय management team ला पुढे आणलं पाहिजे, कारण राजू ह्यांच्यावरचा, भागधारकांचा विश्वास आता तात्कालीन का होईना उडाला आहे (अर्थातच ते स्वत: त्याला जबाबदार आहे).

सत्यमच्या कामगारांमध्ये विश्वास निर्माण करणं फार गरजेचं आहे - उघड आहे की अजून सत्यमला भरपूर clients ला सर्विस द्यायची आहे, आणि सध्या चालू असलेल्या कामांना तितक्याच जोमाने चालू ठेवावं लागेल.

भागधारकांसाठी, नविन Management Team ची बांधणी आणि झालेल्या घटनांची सविस्तर, पारदर्शक जाहीर घोषणा करणं गरजेचं आहे.

clients साठी, assurance toward quality, effective strongly going operations with credibility of past deliverables च्या बळावरती लढावे लागेल.

0 comments: