अमेरिकेचे आगामी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्याच्या मंत्रीमंडळाची निवड करायला सुरुवात केलीय. टिमथी गैथनर यांची वित्तमंत्रीपदी नियुक्ती करण्याचं ओबामांनी जाहीर केलय. टिमथी गैथनर हे अमेरिकेचे ७५ वे अर्थमंत्री असतील. सध्याचे अर्थमंत्री हेन्री पाउल्सन (पॉल्सन) यांची जागा ते घेतील. हेन्री पाऊल्सन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर आणण्यासाठी सुरु केलेल्या बेल-आऊट प्लॅन ला ते पुढे व्यवस्थीत आकार देतील असं कॉर्पोरेटसना वाटतय. ह्या बातमीचं अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजेसनी स्वागत केलय.
मला अमेरिकन कॉर्पोरेटसचं अशा बाबतीत विशेष वाटतं. थोडासा वेगळा मुद्दा आहे, पण मला काय म्हणायचय हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मला सांगा, आपले रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय.व्ही. आर. रेड्डी यांच्या नंतर डी. सुब्बाराव नियुक्ती करण्यात आली, किती लोकांनी डी. सुब्बाराव यांच्या लहानपणापासुनचा इतिहास अभ्यासला असेल? अगदीच थोड्या. पण अमेरिकेमन कॉर्पोरेट्स ट्रेझरी सेक्रेटरी, फेड. सेक्रेटरी यांच्या लहानपणापासुनच्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास केला जातो, कुठल्या परिस्थीतीमध्ये ते कसे वागले, काय बोलले, झालेल्या परिणामांवरती काय प्रतिक्रीया दिली, इत्यादी. एकदम सविस्तर. कारण..... ह्या कॉर्पोरेटसना नवनियक्त पदाधिकाऱ्याच्या शक्य तेवढ्या चाली (moves, strategies) यांचा अनुमान बांधायचा असतो आणि त्यानुसार त्यांच्या बिझनेसला लवचिकता द्यायची असते.
तर ह्या नवनियुक्त अर्थमंत्र्याची अर्थव्यवस्थेसंबंधी काही मते इथे पाहता येतील.
दुसरी बातमी म्हणजे, कोंडलिज्जा राईस ह्यांच्या नंतर अमेरिकेच्या परराष्ट्रामंत्रीपदी, हिलरी क्लिंटन यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. नियुक्ती हा शब्द कदाचित योग्य म्हणता येणार नाही. त्यांना या पदाची offer करण्यात येईल, त्यावर हिलरी यांची स्वीकृती, संमती घेतली जाईल. माझ्या मते तरी, कोंडलिज्जा राईस ह्या त्यातल्या त्यात suitable candidate होत्या. भारत-अमेरिकन आण्विक करारामध्ये त्यांचा महत्वाचा रोल होता. हिलरींची परराष्ट्र धोरणे काय असतील हे पहाणं आलंच. अर्थात ओबामांना वगळुन त्यांना स्वतःचा अजेंडा पुढे ढकलता येणार नाही पण त्यातही त्या कसं काम करतात हे बघू......
-धनंजय
Friday, November 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment