तर झालं असं, की मी D.D.L.J. पहात बसलो होतो. माझा हॉस्टेलमधील wing-mate आला. जेंव्हा मी त्याला सांगितलं की मी हा पिच्चर पहिल्यांदा बघतोय, त्याला भयंकर धक्का बसला !! आणि जेंव्हा मी हे लिहितोय, तेंव्हा मी संपुर्ण पिच्चरच्या फक्त सत्तर टक्के पाहिलाय आणि अजून पुढे पहायचा राहिला आहे. तुम्हीपण कदाचित मला 'odd man out' समजताल. असं नाहीये की मला शाहरूख खान, किंवा K.Jo. पिच्चर आवडत नाहीत !! पण येनकेन कारणेन ... ते आतापर्यंत शक्य झालं नाही. असे चित्रपट अपवादात्मक आहेत की मी पाहिले नाहीत. असो.
आजुबाजूला माझ्या मित्र- आणि मित्रांच्या मित्रपरीवारात जुळुन आलेल्या प्रेमविवाहांमुळे, किंवा काहींच्या बाबतींत प्रेमाचे घोडे लग्नापर्यंत येऊन अडकल्याच्या घटनाप्रसंगांमध्ये, मला असं जाणवलं, की हे माझे मित्र, मैत्रीणी DDLJ, कुछ कुछ होता है, कल हो ना हो, (करन जो. स्पेशल) इत्यादी पिच्चरांमध्ये godly believe ठेवतात/ ठेवायचे.
माझ्या इतर काही मित्रांमध्ये मात्र उलट मतप्रवाह आहे .... ते अशा चित्रपटांची शक्य तेवढी हेटाळणी करतात शाहरुख खान तर त्यांना बिल्कुल आवडत नाही. मी या दोन टोकांच्या मध्ये कुठे तरी असेन. मला असं कुठेतरी जाणवायचं ... जर तुम्ही extremely opinionated नसाल तर बऱ्याचदा तुम्ही अशा गप्पा-गोष्टींमध्ये unnoticed रहाता. असो.
मला आवडणारे काही हिंदी चित्रपट --
My Brother Nikhil हा हिंदी movie पाहिलाय का ? मस्त पिच्चर आहे ... ओनीरने वेगळा विषयावर (HIV-AIDS, Gay Relations) हा चित्रपट बनवलाय.
तसाच Matrubhoomi हासुद्धा हिंदी चित्रपट वाखणण्यासारखा - off trend movie aahe. टुलीपचा, सुशांत सिंगचा अभिनय जमून आलाय. मध्यंतरानंतर तसेच शेवटी - climax मध्ये तर movie disturb करतो. खरंच अशी वेळ आली तर कसं होईल असा प्रश्न या चित्रपटाद्वारे दर्शकांना विचारतो.
मला आवडलेले इतर चित्रपट.
- Black Friday (director has ready script - Verdict of Tada Court) but exceptional performance by K.K., बादशाह खानची भुमिका करणारा अदित्य श्रीवास्तव पण झक्कास !!
- सरफरोश (आमिर खान आणि जॉन मॅथ्यु मॅथन यांची combination अजून काय पाहिजे ? अर्थात सोनाली बेंद्रे ही bubbly, छान वाटते)
- हजारों ख्वाहिशें ऐसी (के.के. मेनन, चित्रांगदा सिंग .... फिदा आहे हो)
- Train to Pakistan (खुशवंत सिंगांच्या नावाजलेल्या पुस्तकावर बेतलेला आहे)
- खामोशी (गाणी, नाना, मनिषा, सलमान, सीमा बिश्वास, झक्कास )
- अकेले हम अकेले तुम
- स्वदेश
- चक दे इंडिया (बऱ्यापैकी Hoosiers 1999 ची कॉपी वाटत असली तरी चित्रपट इन्स्पायरिंग आहे)
- तारे जमीन पर (ऑस्कर नॉमिनेशन )
- लाईफ इन अ... मेट्रो (I can watch it all time, repeatedly - nicely woven different stories together to indicate life in a metro)
- ओंकारा
- जब वी मेट (never before and after combination made long lasted impression, I have watch it in pieces many times, still love it)
- मैने प्यार किया (refreshing भाग्यश्री पाटणकर, लास्टिंग इम्प्रेशन - सलमान खान )
- ब्लॅक (अमिताभ, राणी मुखर्जी - अमिताभची कसोटी लागली असेल असा एकमेव चित्रपट वाटतो मला ... thanks to संजय लीला भंसाली)
- सलाम नमस्ते (I think, well managed collage of different story was tried for the fist time in Hindi movies. जुही अनिलची स्टोरी मला विशेष भावली .. priyank rocks !!)
- Guide (माझ्या काकांमुळे पाहण्याची संधी मिळाली .. अप्रतिम चित्रपट .. गाणी, नृत्य, climax, विजय आनंदचं दिग्दर्शन, वहिदा, गाईड-रोमियो पासून बाबा झालेला देव आनंद)
- जाने भी दो यारों (अप्रतिम ... विस्कटलेल्या नशिबाच्या लोकांची खुलवलेली फरफट)
- कंपनी (अजय देवगण, विवेक ओबेरॉय, आंतरा माळी, रामू ... कधीतरी 'जमलेली' combination)
- विरासत (अनिल, तब्बू, मस्त हसणारी पूजा बात्रा .. हॉटेल मॅनेजमेंट करतो असं म्हणणाऱ्या विजय ठाकूरचा मुखिया होण्या पर्यंतचा प्रवास अनिलने मस्त दाखवलाय)
- दो आंखे बारा हाथ (व्ही. शांतारामांचा उच्च दर्जाचा, शेवटी शेवटी रुखरुख वाटायला लावणारा हा चित्रपट classic आहे)
- जो जिता वही सिकंदर (परत एकदा आमिर )
- रंग दे बसंती (ए. आर. रेहमान, आमिर, इ.)
- दामिनी, घायल, घातक, इत्यादी (मिनाक्षी शेषाद्री, सनी देओल combo)
- निदान (संजय मांजरेकरचं हिंदी दिग्दर्शनामध्ये पदार्पण , संजय दत्त, सुनिल बरवे, शिवाजी साटम, रीमा लागू आणि इतर)
अजून लांबणारी यादी ... यात इंग्रजी, आंतरराष्ट्रीय भाषांमधील चित्रपट वगळले आहेत
-धनंजय.
Sunday, October 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment