Thursday, October 23, 2008

मंदीचे झटके

मंदीचे झटके वित्त उद्योगापुरते सिमीत राहणार नाहीत हे स्पष्ट होतं. त्याचे ripple effects इकडे तिकडे होणार हे कळत होतं पण कोण कोण आडवं पडणार हे एवढंही नक्के माहित नाही (निदान मला तरी )- बघू प्रयत्न करून काही समजतय का ?

१. याहू! या ऑनलाईन सर्च इंजिन कंपनीने loss report केला. आणि आता ते त्यांच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १४०० ना काढणार आहेत. काही काळापुर्वी मायक्रोसॉफ्टने याहूला विकत घेण्यासाठी ऑफर केली होती. त्यावेळी ते डील फिस्कटले.. कारण याहूला offered price कमी वाटली होती. आता तर काय दोघांच्या शेअर्सने बऱ्याच खालच्या पातळ्या गाठल्या आहेत. आता याहू! चे AOL बरोबर merger चे प्रयत्न चालू आहेत.

२. गुगल - ऑनलाईन सर्च इंजिन जरी profit book केला असला तरी, ग्लोबल स्लोडाऊन पाहता त्यांनी असं जाहीर केलय की ते आता सावधपणे recruitment करणार आहेत. त्यांचा कमाईचा मुख्य source म्हणजे ऑनलाईन जाहिराती, आणि त्यांना ह्या जाहिरातींच प्रमाण कमी होण्याची भीती वाटतेय.

३. OPEC च्या सदस्य देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या पातळीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात केलीय. हे त्यांचं मात्र बरं आहे !! भाव वाढत होते त्यावेळी म्हणायचे ... Demand-Supply principle आहे हो... चालायचच. आता त्यांच्या पोटावर पाय पडायला लागल्यावर.. कसंचं principle आणि कसंचं काय!!

४. जगातल्या काहीच मोठ्या कंपन्यापैकी एक असलेल्या, वॉलमार्टला खरं तर ह्या स्लोडाऊनमुळे थोडा फायदा होणं अपेक्षीत होतं... का ??
अमेरिकन नागरिकांचं disposable income कमी होत असताना ते, स्वस्तात स्वस्त देणाऱ्या वॉलमार्ट कडे वळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यालाही छेद देऊन, वॉलमार्ट्ने त्यांचं sales forecast कमी केलय. नक्कीच काहीतरी कारण असावं त्यामागे.

५. आता कार्पोरेट बॉंड क्राईसिस असं ऐकायला येतय. बघू काही दिवसातच कळेल काय होतय कार्पोरेट बॉंड्स ला.

0 comments: