झिंबाब्वे ह्या देशामध्ये महागाई एवढी वाढलीय की त्यांच्या Central Statistical Organization ने .... इथुन पुढे महागाई ठरवणे शक्य होणार नाही असं जाहीर केलेय. आपल्याकडे महागाईची टक्केवारी १२ च्या वरती गेली होती. त्यामुळे काय हालत झाली होती हे अनुभवलेलं आहेच. (महागाईवरून मला माझ्या कॉलेजमधली घडलेली एक घटना आठवतेय... पण त्याबद्दल hopefully पुढच्या ब्लॉगमध्ये). झिंबाब्वेमध्ये हा महागाईची टक्केवारी ९,०३०,००० च्याही पलीकडे गेलीय. त्यांना ह्या महागाईमुळे व्यवहार चालू ठेवण्यासाठी, वारंवार मोठ्या रकमेच्या(म्हणजे आकड्यांच्या) नोटा छापणे भाग पडतेय.
खालील चित्र, इंग्रजी विकिपेडियावरून घेतलय... त्यात, १०० बिलीयन झिंबब्वीयन डॉलरमध्ये फक्त तीनच अंडी विकत घेता येतात असं ज्या दिवशी हे चित्र घेतलय, त्या दिवशी, कोणी नागरिक दाखवतोय. त्यानंतर, त्यांना नविन नोट काढणं भाग पडलं असावं असं मला वाटतय.

झिंबाब्वेची अतीमहागाई : संदर्भासाठी इथे पहा.
:Dhan
0 comments:
Post a Comment