मोर्गन स्टेनले ही फ़क्त इन्वेस्टमेंट बॅंक न रहाता आता बऱ्यापैकी commercial बॅंक झाली आहे - लेहमन, मेरील लिंचच्या अनुभवावरुन. ( साधी बॅंक होण्यामागचा हेतू असा की, बॅंक जर गोत्यामध्ये आली, तर अमेरिकन फ़ेडरल बॅं. म्हणजेच, फ़ेडकडून त्यांना कर्ज घेता येते). असो ... तर....
ह्या credit crunch च्या झांगडामध्ये मोर्गन स्टेनले पण अडकली आहे. बॅंकेला गेल्या महिन्यामध्ये जापनीज बॅंक ग्रुप मित्सुबिशी UFJ Financial Group ने मदतीचा हात पुढे केला होता. मदतीचा हात म्हणजे मोर्गन स्टेनलेच्या प्रेफ़रंस शेअर्सची खरेदी- थोडक्यात बॅकेची मोठी भागधारक.
जापनीज कंपन्यांची (Automobiles सारखी - Honda, Toyota, Mitsubishi, financial sector मध्ये) मक्तेदारी सुरु होण्याची तर ही नांदी नाही ना?
मित्सुबिशी UFJ Financial Group ने मोर्गन स्टेनलेच्या प्रत्येक शेअर साठी सुमारे २५ डॉलर्स देण्याची तयारी दाखवली होती. विशेष म्हणजे मोर्गन स्टेनलेचा शेअर ह्या वर्षामध्ये सुमारे ९० डॉलर्स पासून उतरून त्यावेळी $१८-$२० होती. मित्सुबिशी UFJ Financial Group ने premium offer करत ते शेअर्स, $ २५ ला विकत घेण्याची तयारी दाखवली. पण गेल्या महिन्यापासून मोर्गन स्टेनलेचा शेअर उतरत उतरत आता $८-$९ दरम्यान विसावला आहे. (investors's panic !!).
मला असं वाटत होतं, जर का आता मित्सुबिशीने त्यांची offer मागे घेतली, तर मोर्गन स्टेनलेला तग धरणं अवघड जाणार .... आणि आता कदाचित तशी वेळ येऊन ठेपली आहे. मार्केट व्हल्युएशन लक्षात घेता, मित्सुबिशीने offer revise करायचं ठरवलं आहे. US फेड ला अर्थातच मोर्गन स्टेनलेचा लिहमन होण्यापासून जे प्रयत्न शक्या आहे ते करावे लागतील. पण याचा अर्थ असा नाही की फेडला मोर्गन स्टेनलेमध्ये गुंतवणुक करावी लागेल. ते सद्यस्थितीमध्ये अवघड वाटतय. बघू काय होतय उद्या ते ....
Sunday, October 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment