मी तसा, विकीपेडियाचा ब-याच दिवसापासून वापर करतोय. खासकरून इंग्रजी विकीपेडियाचा अर्थात काही नवीन संज्ञांबद्दल माहीती हवी असेल तर. पण मराठी विकीपेडियाचा वापर तसा मी क्वचितच केल्याचं मला आठवतय.
काही दिवसांपूर्वी मी सहज मराठी विकीपेडियाला भेट दिली. त्याच्या मुखपृष्टावर म्हटलय तसं, बऱ्यापैकी बाल्यावस्थेत आहे हे जाणवलं. बरेच वर्ग, उपवर्ग दिसतात, पण जसे आपण आत आत जाऊ, तसं लक्षात येतं की ह्यात आपल्याला हवी ती माहिती मिळत नाही.
पण मे हे नक्कीच जाणतो की जेवढं लिहिलं गेलंय त्यासाठी ज्यांनी कुणी लिहीलं आहे, त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागली असणार. आणि बऱ्याच लोकांनी थोडाफार वाटा उचलला तरच मराठी विकीपेडिया चांगल्या स्थितीमध्ये येईल.
अर्थात ज्यांनी कोणी, मराठी विकीपेडियासाठी मेहनत घेतली आहे, त्यांचं काम बघून मलापण माझा काही वाटा देता येईल अशी इच्छा झाली आहे. लवकरच त्यासाठी मी प्रयत्न करेन.
सध्यातरी, खालील विषयांबद्दल लिहिण्याची माझी इच्छा आहे.
१. अर्थव्यवस्था
२. भारतातील तसेच इतर देशातील नावाजलेल्या कंपन्या
३. काही नवीन डेव्हलपमेंट उदा. कोस्काटा, संगणक प्रोग्रामिंग, ऍप्लीकेशन्स, इत्यादी.
जसा जसा वेळ मिळेल, तसं लिहिण्याचा विचार आहे.
Thursday, October 09, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment