Sunday, July 06, 2008

मागील पानावरून पुढे ...

अगदी मागे जाण्याचा माझा आता तरी विचार नाही पण म्हटलं .. कायम सुखासुखी जाणारी आपला उन्हाळा ह्या वेळेस कसा वेगळा गेला त्याचा मागोवा घ्यावा. तर एप्रिल-मे २००८.

सहसा वापरत नसलेल्या ...'ओर्कट' ह्या सामाजिक संगठण (social networking म्हणायचय मला ;)) वर ब-याच काळाने पुनर्प्रवेश केला. ओर्कटच्या डेव्हलपअर्सने त्यात अलिकडे कोणी नवीन काय काय केलय याची माहिती दयायला सुरुवात केलीय. त्यामूळे माझ्या कॉलेज-मित्रांचे updates यायला सुरुवात झाली होती. माझ्या हया मित्रांचे परदेशातल्या हॉटेल्समधील प्रिमिअम लौंजचे, मोठ्या गाड्यांचे, आजुबाजूच्या उंचच उंच आणि संपुर्ण काचेच्या इमारतींचे असे एकामागे एक फोटोस दिसायला लागले. कोणी हॉटेल रूमचा डायनिंग टेबलचा, तो त्या पाच जणांच्या रूममध्ये एकटाच जेवण करतोय, कोणी त्याच्या अलिशान लेक्सस गाडीच्या डावीकडे उभा रहा, उजवीकडे उभा रहा, कोणी त्याचे ईलेक्ट्रोनिक गॅझेट्स दाखव असे फोटोस लावले होते. वा वा. डोळे दिपून जावे !!

 त्याचवेळी अस्मादिक गुरगांव या उच्चभ्रू लोकांच्या वसाहतीपासून ३० किलोमीटर दुर "बसई" या गावाच्या शिवेवर असलेल्या 'एका' कंपनीच्या अवाढव्य डिश्ट्रीब्युशन सेंटरमध्ये जायचो. गुरगांव म्हणजे भारताच्या राजधानीच्या विस्तारीत भाग. मात्र हा एकमेव भाग नाही. असे एकूण तीन इतर भाग आहेत. त्यांना एन.सी.आर. म्हणतात. दिल्लीजवळील गुरगांव, नोयडा (North Okhla Industrial Development Area) आणि गाझियाबाद, फ़रीदाबाद यानाच दुसरे नाव नॅशनल कॅपिटल रिजन म्हणजेच थोडक्यात एन.सी.आर. 

पण मी तिथे रोज कसा पोहचायचो हे एक प्रकारे दिव्यच होते. देशाच्या राजधानीच्या जवळच्या या गावाला म्हणावी तशी कनेक्टिवीटी काही नाही. एकंदर येण्याजाण्याचे भयंकर वांधे. तुम्ही विश्वास ठेवाल काय .... की ह्या ऑटोमध्ये १५ लोक बसतात तेही रोज आणि गर्दीच्या वेळी तर ह्याव्यतिरीक्त ३-४ जण आजुबाजूला लोंबकळून असायचे.

तर ह्या बसईमध्ये गेल्यावर तिथे संपुर्ण दिवस लोकांशी गप्पा मारता मारता माहिती गोळा कर, त्या माहितीत थोडं डोकावून बघ, काही शोधून बघ, नाहीच सापडलं काही तर मग परत गप्पा चालू. ह्या ठिकाणापासुन जवळच एक मीटरगेज रेल्वेलाईन जाते. संध्याकाळी रेल्वेलाईनजवळ जाऊन सुर्यास्त पहाण्यासाठी मी थोडा वेळ थांबायचो. गावाकडच्या हरयाणवी जाट लोकांच्या तिखट भाषेचा सामना करण्यासाठी इथेच यावे ;-)

संध्याकाळी परत येताना उच्च्भ्रू लोकांच्या गाडीच्या दिव्यांत, झगझगीत दिव्यांनी चमकणा-या इमारतींच्या प्रकाशात हे हातगाडी ओढुन कसंबसं पोट भरणारे लोक दिसायचे आणि या एकमेका जवळ रहाणा-या लोकंमधील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता अगदी अंगावर येते. हे दुसऱ्याप्रकारचं दिपुन जाणं. पण कशी बदलणार ही परिस्थीती ? आता ह्या विषयाला हात नाही घालंत.

 रहायला अस्मादिक एका कॉलेजच्या होस्टेलमध्ये.पण एकदा का बसईवरून परत आलं, की जिवाला थोडी शांतता. एकतर त्याच कॉलेजच्या असणार-या मुला-मुलींबरोबर (?) चांगली ओळख झाली होती त्यांच्याबरोबर थोडं टी.टी., बॅडी खेळाणं, त्यानंतर कधी तरी २०-२० मॅचसाठी टीव्ही पहावा असं करून मग रूम मध्ये जावं. थोडा वेळ इकडे-तिकडे भटकून परतलं की रात्री ११:०० च्या आसपास माझा रूमी येण्याची वाट पहायची. तोच तो.... "वि. वि. खर" म्हणजे कलंदर पट्ठ्या !! तसा त्याचं कुळ-मुळ काश्मिरात, पण काळाच्या ओघात त्याचे घरचे हैद्राबादला स्थायिक झाले आणि हा पठ्ठ्या काहीसा गुल्ट झाला !

मी गुरगांवलासाठी निघण्यापूर्वी असं ठरवलं होतं की मी पहिल्यांदा उत्तर विभागात चाललोय ना .. मग मी तिकडे शक्य तितके फ़िरणार. अर्थात सरतेशेवटी 'शक्यते'चं प्रमाण अगदीच कमी झालं. असो. 

तर मी आणि 'वि.वि. खर' भयंकर उचापती करून गुरगांव, दिल्ली (धोला कुंआ), सराये कालेखां, परत दिल्ली स्टेशन आणि रेल्वेला शेंडी लावून (अनिच्छेने हे म्हणणे आलेच) आग्र्याला पोहचलो. दुस-या दिवशी आरामात उठून बाहेर निघालो. २-३ दिवसात तिथे मु.मायावती येणार असल्यामूळे साफ़सफ़ाईची लगबग चालू होती. मुसलमान भाईंची बहुसंख्यांकता जाणवण-या गल्लीबोळातून आम्ही एकदाचे ह्या ठिकाणी पोहचलो.

ह्या कुटुंबीयांचा एक फोटो काढून आम्ही आत सटकलो (ते मी फोटो काढावा म्हणुन का उभे राहिलेत ?) आणि समोर पहातोय तर तोच तो जगप्रसिद्ध ताजमहाल.

दूरून तर छान दिसत होता. पण मला जवळ जाऊन पहाण्याची इच्छा होती. गेलो तिथेही पोहचलो. पण माझा दिग्मूड झाला. हा तो ताजमहाल नव्हता की जो कधी एके काळी दिवसाच्या बदलत्या रंगाप्रमाणे रंगबिरंगी व्हायचा. प्रदुषण, गैर-हाताळणीमूळे ह्या जगप्रसिद्ध वास्तूची रया गेली आहे असं मला वाटलं.


अपेक्षाभंग झालेले आम्ही (मला असं का वाटतय की मी संस्कृत उताऱ्याचे भाषांतर करत आहे ? ) तिकडून निघुन शेजारील लाल किल्ल्यावर गेलो.

भारतीय लश्कराने ह्या संपुर्ण इमारतीचा कब्जा घेतलेला आहे. भारतीय लश्कर इथे आपले रिसोर्स का वाया घालवत आहे याचे उत्तर काही मला मिळाले नाही. लाल किल्ल्यात फिरताना "हा" फोटो जेथून काढला त्या महालात पोहचलो.


ज्या बादशहा शहाजहानने आपल्या 'निस्सीम' प्रेमाचं (एकुणच मला त्याचं नुरजहांवरचं निस्सीम प्रेम एक दिखाऊपणा वाटला ) जागतिक लौकिकाला पात्र होईल असं प्रतिक बनवावं म्हणून सलग १५+ वर्षे राबून-राबवून ऐतिहासिक ताजमहाल बनवला त्याच बादशहा शहाजहानला त्याच्या पोऱ्याने म्हणजे सम्राट औरंगजेबाने ताजमहालाच्या जवळील लाल किल्ल्यात नजरकैद करून डांबून ठेवलं. तोच इतिहासप्रसिद्ध ताजमहाल पाच+ वर्षे पहात पहात रडत -कुंठत शहाजहानने याच महालात, नजरकैदेमध्ये प्राण सोडला.

बघा तुम्हालापण इथुन ताजमहाल दिसतोय का ? (मला काय म्हणायचय हे समजावणं अवघड आहे :( )

लाल किल्ल्यातुन बाहेर येऊन पहावं तर चौकामध्ये मदमस्त अश्वावर रुढ झालेल्या, सम्राट औरंगजेबास जेरीस आणणाऱ्या शिवाजी महाराजांचा पुतळा !!



पण ह्या आग्र्याच्या भेटीचं मला एक समाधान लाभलं. भले मी दुसऱ्या देशात जाऊन grand canyon , स्टॅचू ऑफ लिबर्टी आणि इतर पहाण्यासारख्या गोष्टी पाहील्या असत्या, पण मनाला एक हुरहुर लागुन राहिली असती की मी भारतात राहून अजुन जगप्रसिद्ध ताजमहाल नाही पाहिला. आता तशी भावना मला छळणार नाही.

3 comments:

आजानुकर्ण said...

tu tujhi ambition ka nahi neli tikda ;)

:D said...

@आजानुकर्णा,
दिल्लीच्या उन्हाळयाची ख्याती ऐकली
मला 'Ambition' नेण्याची धास्ती वाटली ;)

पण तसा उन्हाळा जाणवलाच नाही. उलट बऱ्याच वेळा पाऊस पडला, अर्थात त्यानुळे पण त्रास झालाच असता!

sandeep said...

tula अस्मादिक ha shabd tula ka awadatao :)